प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यवतमाळ जिल्हा यांचेवर कोरोनाचा कहर
प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यवतमाळ जिल्हा यांचेवर कोरोनाचा कहर
सुपर भारत वृत्तसेवा /
दि 14पांढरकवडा - यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षणीय वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना सदृश्य रूग्णांचे प्रत्येक स्वॅब घेण्याची जबाबदारी कोरोना लढाईमधील प्रथम पळीतील लढवैय्ये प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यांचा जीव धोक्यात आला आहे.
जिल्हातील सर्वच प्रयोगशाळा वैज्ञानिक याना कामाचा प्रंचड ताण आहे त्यांना जास्तीत जास्त स्बॅब घेण्याकरिता दबाव निर्माण होत आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी यवतमाळ कोवीड केअर रेंटर क्रमांक 1 येथे 100 चे वर स्बॅब घेत असतांना तंत्रज्ञ श्रीमती स्वाती दाणी यांना भोवळ येऊन त्या जागीच कोसळल्या
दिनांक 31 मे 2020 रोजी उमरखेड ब्लॉक मध्ये तंत्रज्ञ श्री ढोके हे पीपीई काढत असतांना जीव गुदमरून बेशुध्द पडले होते
दिनाक 26 जुन रोजी झरीजामणी येथील तत्रज्ञ श्री जलमकर हे अपंग असूनही त्यांनी दिवसभर कोवीड केअर सेंटर येथे काम केले त्यांना त्यांच्या अपंग पायाचा भयंकर वेदना चालु होत्या अशा अवस्थेत तेथील टीएचओ यांनी त्यांना रात्री 10 वाजता झरी जामणी येथून यवतमाळ येथे 120 किमी अंतर स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आणि ते मध्यरात्री 1 वाजता प्रयोगशाळेत पोहचले
आयसीएमआर गाईडलाईन नुसार तंत्रज्ञ यांना रूग्णाचे स्वॅब घेण्याकरिता हवेशीर कज्ञ , कलेक्शन बुथ, पीपीई कीट परिधान /काढणे करिता डोनिंग / डोफिंग रूमची व्यवस्था असणे अत्यंत गरजेचे आहे शासन नियमानुसार कोवीड मध्ये काम करतांना तंत्रज्ञानाची ड्युटी चक्राकार पध्दतीने लावणे गरजेचे आहे तसेच कोवीड मध्ये काम केल्यानंतर 7 दिवसांचा कॉरेंटाईन पिरियड अपेक्षीत आहे पण गेल्या दोन महिन्यांपासून चक्राकार तर सोडाच त्यांना साधा रविवार किंवा कुठलीही सुट्टी मिळाली नाही तंत्रज्ञांना स्वॅब घेण्याकरिता स्वतंत्र कक्ष तर सोडाच अक्षरशः केटेंटमेंट झोन मध्ये , कुठे कडक उन्हात, टिणाचे शेड खाली तर कुठे झाडा खाली रूग्णांचे स्वॅब घेण्यास भाग पाडत आहेत असा वेळेस त्यांच्या जीवीताची हानी झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असा सर्व कठीण परिस्थतीत प्रशासनाने कोरोना सदृश्य रूग्णांचे स्वॅब घेण्याकरिता टीम बी ची व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा साथीच्या आजारामध्ये रूग्णांची सेवा करण्यास तंत्रज्ञ उत्सुक आहेत पण आय सी णे आर गाईडलाईन नुसार तंत्रज्ञांना सुविधा न पुरविल्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.

Comments
Post a Comment