अंबोडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा



*अंबोडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा*


यवतमाळ - ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, रिलायन्स फाउंडेशन व विकासगंगा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या शाश्वत उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ वर्षा बा. आडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेवक डॉ.विजयकुमार ठेंगेकर, पवन अंबुलकर, निलेश खडसे, वैभव गायकी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.


यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, स्थापना कशी आणि कधी होते, शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्दिष्टे,  सेवा सुविधा विक्री व विपणन, उत्पादनाचे मूल्यवर्धन, इनपुट सेवा बद्दल माहिती, माहिती व सल्ला, सामूहिक खरेदी आणि विक्री, आर्थिक सुविधा, शेतातील उपकरणे बद्दल माहिती, संचार आणि नेटवर्किंग बद्दल माहिती, शेतकऱ्यांसाठी फायदे इत्यादी विषयावर प्रशिक्षक निलेश खडसे यांनी माहिती दिली.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन अंबुलकर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैभव गायकी यांनी केले. या कार्यशाळेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

ईस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एलियन (परग्रह जीव) बाबत केला खुलासा – एलीयन च्या अस्तित्वाबाबत ते काय म्हणाले वाचा

कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती अभियान