Posts

Showing posts from August 25, 2024

अंबोडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा

Image
*अंबोडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा* यवतमाळ - ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, रिलायन्स फाउंडेशन व विकासगंगा सामाजिक सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या शाश्वत उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंचा सौ वर्षा बा. आडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामसेवक डॉ.विजयकुमार ठेंगेकर, पवन अंबुलकर, निलेश खडसे, वैभव गायकी प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय, स्थापना कशी आणि कधी होते, शेतकरी उत्पादक कंपनीचे उद्दिष्टे,  सेवा सुविधा विक्री व विपणन, उत्पादनाचे मूल्यवर्धन, इनपुट सेवा बद्दल माहिती, माहिती व सल्ला, सामूहिक खरेदी आणि विक्री, आर्थिक सुविधा, शेतातील उपकरणे बद्दल माहिती, संचार आणि नेटवर्किंग बद्दल माहिती, शेतकऱ्यांसाठी फायदे इत्यादी विषयावर प्रशिक्षक निलेश खडसे यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन अंबुलकर तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैभव गायकी यांनी केले. या कार्यशाळेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व भगिनी उ...

ईस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एलियन (परग्रह जीव) बाबत केला खुलासा – एलीयन च्या अस्तित्वाबाबत ते काय म्हणाले वाचा

Image
ईस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एलियन आहेत की नाहीत ते सांगीतले   सुपर भारत ऑनलाईन नवी दिल्ली – नुकत्याच उत्तेजक विधानात, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष यांनी पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीच्या संभाव्य अस्तित्वाविषयी संभाषणे मांडली आहेत. मानवी तंत्रज्ञानातील जलद प्रगतीवर जोर देऊन, इस्रो प्रमुख सुचवतात की परकीय संस्कृतींचे अस्तित्व केवळ शक्य नाही तर संपूर्ण विश्वात शक्य आहे. हा वैचित्र्यपूर्ण दृष्टीकोन आपल्याला पृथ्वीच्या पलीकडील जीवनाविषयीच्या आपल्या आकलनावर पुनर्विचार करण्यास आणि ब्रह्मांडातील आपल्या स्थानाचे व्यापक परिणाम विचारात घेण्यास आमंत्रित करतो. तांत्रिक प्रगती आणि अलौकिक जीवन इस्रोच्या अध्यक्षांनी गेल्या शतकात मानवतेने केलेल्या नाट्यमय तांत्रिक झेपांवर प्रकाश टाकला. अगदी शंभर वर्षांपूर्वी, आजच्या मानकांच्या तुलनेत तांत्रिक क्षमता तुलनेने आदिम होत्या. ही जलद उत्क्रांती पृथ्वीबाहेरील सभ्यतेचा विचार करण्यासाठी पार्श्वभूमी म्हणून काम करते, संपूर्ण विश्वात विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर जीवन स्वरूपांचे संभाव्य अस्तित्व समजून घेण्यासाठी एक फ्रेमवर्क ऑफर करते. पॉडकास्ट...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतलेला निर्णय तडीस नेतात - पालकमंत्री संजय राठोड

Image
चांगल्या योजनांसाठी पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचे आभार यवतमाळ, दि.25 (जिमाका) : महिलांच्या कल्याणासाठी शासन काम करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत होते. महिला पुढे गेल्या पाहिजे. समाजात, कुटुंबात त्यांचा आदर व भागिदारी वाढावी यासाठी योजना सुरु करणार असल्याचे ते म्हणाले आणि त्याप्रमाणे अनेक योजना त्यांनी सुरु केल्या. त्यामुळे घेतलेला निर्णय तडीस नेणारे ते राज्याचे मुख्यमंत्री आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी काल वचनपूर्ती मेळाव्यात सांगितले. काल भर पावसातही महिलांच्या अलोट गर्दीने वचनपूर्ती मेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी पालकमंत्र्यांनी महिलांसाठी आणलेल्या चांगल्या योजनांबद्दल आपल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांचे सरकार कसे असते, याचा अनुभव आपण घेत आहोत. शेतकरी, महिला, गरीब, कामगार व युवकांना केंद्रबिंदू मानून शासन काम करत असल्याचे पालकमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेतून महिलांना प्रतिमाह 1 हजार 500 रुपये अर्थसहाय्य दिले जात आहे. जिल्ह्यात...