प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यवतमाळ जिल्हा यांचेवर कोरोनाचा कहर
प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यवतमाळ जिल्हा यांचेवर कोरोनाचा कहर सुपर भारत वृत्तसेवा / दि 14 पांढरकवडा - यवतमाळ जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या लक्षणीय वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत कोरोना सदृश्य रूग्णांचे प्रत्येक स्वॅब घेण्याची जबाबदारी कोरोना लढाईमधील प्रथम पळीतील लढवैय्ये प्रयोगशाला वैज्ञानिक अधिकारी यांचा जीव धोक्यात आला आहे. जिल्हातील सर्वच प्रयोगशाळा वैज्ञानिक याना कामाचा प्रंचड ताण आहे त्यांना जास्तीत जास्त स्बॅब घेण्याकरिता दबाव निर्माण होत आहे. दि. 10 ऑगस्ट रोजी यवतमाळ कोवीड केअर रेंटर क्रमांक 1 येथे 100 चे वर स्बॅब घेत असतांना तंत्रज्ञ श्रीमती स्वाती दाणी यांना भोवळ येऊन त्या जागीच कोसळल्या दिनांक 31 मे 2020 रोजी उमरखेड ब्लॉक मध्ये तंत्रज्ञ श्री ढोके हे पीपीई काढत असतांना जीव गुदमरून बेशुध्द पडले होते दिनाक 26 जुन रोजी झरीजामणी येथील तत्रज्ञ श्री जलमकर हे अपंग असूनही त्यांनी दिवसभर कोवीड केअर सेंटर येथे काम केले त्यांना त्यांच्या अपंग पायाचा भयंकर वेदना चालु होत्या अशा अवस्थेत तेथील टीएचओ ...