कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती अभियान

 कृषी विभागाच्या वतीने कीटकनाशक फवारणी बाबत जनजागृती अभियान

सुपर भारत वृत्तसेवा 


घाटंजी -  (तालुका प्रतिनिधी)तालुक्यातशेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी करताना काय खबरदारी बाळगावी याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालय घाटंजी यांचे वतीने तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेऊन चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे
कीड व रोग नियंत्रणासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्या जातो.  कीटकनाशकांची फवारणी करताना तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे बरेचदा  शेतकऱ्यांच्या दुर्लक्षीत पणामुळे फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता असते तशा घटनाही  तालुक्यात उघडकीस आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणी करताना विशेष खबरदारी घेऊन फवारणी करावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी घाटंजी अमोल मंचलवार यांनी केले आहे शेतकऱ्यांनी कीटकनाशके नेताना स्वतंत्र पिशवी ठेवावी बाजारहाट करताना अन्नपदार्थ जनावरांची  वैरण अथवा खाद्यपदार्थ बरोबर घेऊन जाऊ नये मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचे पॅकिंग डोक्यावर खांद्यावर अथवा पाठीवर वाहून नेऊ नये शिफारस केलेली कीटकनाशकेच खरेदी करावी व शिफारस केलेलीच वाढ नियंत्रक औषधांचा वापर करावा तसेच कीटकनाशके वापरण्यापूर्वी सोबतचे लेबल व माहिती पत्रक वाचूनच फवारणी करावी खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे कीटकनाशकांची मात्रा फवारणीसाठी योग्य ती मोजून घ्यावी फवारणी करताना संरक्षक कपडे बूट हात मोजे चष्मा टोपी चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा फवारणी करतेवेळी शक्यतो स्वच्छ पाण्याचा वापर करावा सकाळ किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी किटकनाशकाचा शरीराशी सरळ संपर्क आल्यास शरीर पाण्याने स्वच्छ धुवावे असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले

 फवारणी करताना हे करू नये तणनाशकाचा पंप कीटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरू नये नोझल मधील कचरा तोंडाने फुंकु नये फवारणी करतेवेळी खाद्यपदार्थ किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नये आजारी व्यक्तीकडून फवारणी करून घेऊ नये

विषबाधा झाल्यास हे करावे कीटकनाशकाची पोटातून, त्वचा, डोळे ,श्वसन इंद्रिय इत्यादी द्वारे  विषबाधा होऊ शकते विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे तसेच त्याच्या अंगावरील कपडे बदलवावे कीटकनाशक पोटात गेल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब ओकारी करण्यास उपाययोजना करावी तसेच श्वासोश्वास योग्य रीतीने सुरू आहे का ते तपासावे श्वास अनियमित किंवा बंद असल्यास त्वरित त्याला कृत्रिम श्वास सुरू करावे बेशुद्ध अवस्थेत असल्यास त्याला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न करावे बाधित व्यक्तीस त्वरित कीटकनाशकाच्या माहितीपत्रका सह डॉक्टरांना पाठवून त्यांच्या निगराणीत उपचार सुरु करावे

Comments

Popular posts from this blog

अंबोडा येथे शेतकरी उत्पादक कंपनी सेवा सुविधा जनजागृती कार्यशाळा

ईस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी एलियन (परग्रह जीव) बाबत केला खुलासा – एलीयन च्या अस्तित्वाबाबत ते काय म्हणाले वाचा